मिळून साऱ्याजणी ऑनलाइनच्या कार्यकारी संपादक दीक्षा दिंडे या अपंगत्व, सुलभता आणि समावेशन या विषयांवर काम करणाऱ्या EquiBridge Foundation च्या सह-संस्थापक आहेत. त्यांना जन्मतः सेरेब्रल पाल्सी हे अपंगत्व आहे. समाजातील विविध स्तरांवरील समावेशनाची वास्तव स्थिती जाणून घेण्यासाठी, अपंग व्यक्तींचे अनुभव समजून घेण्यासाठी आणि समावेशक समाजाची संकल्पना अधिक व्यापकपणे पोहोचवण्यासाठी त्यांनी काही महिन्यांपूर्वी …
इन्क्लुजन यात्रेला सुरुवात होऊन तीन दिवस झाले होते. शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधताना समावेशनाबद्दल अनेक नवे प्रश्न समोर येत होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि त्यांच्या निरागस प्रश्नांमुळे आत्मविश्वासही वाढत होता. पण चौथ्या दिवसापासून यात्रेने काहीसं वेगळं वळण घेतलं. प्रवासात अनपेक्षित अडचणी आल्या आणि पुढची काही नियोजनं बदलली. त्याच वेळी काही अनोळखी…